उठा सकळ जन उठिले नार
35.
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥धृ॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनिया ॥२॥
तुका म्हणे काय पढियंते ते मागा । आपुलाले सांगा सुख दुःख सकळ ॥३॥
काकडा समाप्त
जयजय विठोबारखुमाई भजन म्हणावे
