वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

ब्रह्मज्ञानी पुरूष त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075086 · अभंग क्र. ४२७

427.
ब्रह्मज्ञानी पुरूष तोचि ओळखावा ।
नयनांजनी पाहावा ब्रह्मठसा ॥१॥
देखतसे देही द्वैत भेदातीत ।
तोची धन्य संत माझे मनी ॥२॥
त्याचे चरणोंदकी जान्हवी पवित्र ।
सहस्रदळावर लक्ष ज्यांचे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला ।
देखता तयाला नमन माझे ॥४॥

अर्थ :
ज्याच्या डोळ्यातील तेजांत ब्रह्मप्राप्तीची खूण दिसते त्यालाच ब्रह्मज्ञानी समजावे जो देही असूनही ज्याला द्वैत भेदाच्या पलीकडील परमात्म्याचे दर्शन झालेले असते तोच खरा संत असे माझ्या मनात येते. ज्या पुरुषाचे लक्ष ब्रह्मरंध्रातील सहस्रदळा वर म्हणजे परमात्म्यावर आहे. अशा पुरूषाच्या पायातील तीर्थ जान्हवी आहे असे समजा. अशा पुरुषाला पाहिल्याबरोबर त्याला माझे दंडवत असो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग