वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

चिंतिता साधक मनासि न

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089981 · अभंग क्र. १५८

158.
चिंतिता साधक मनासि ना कळे । तो गोपिकासी आकळे करिता ध्यान ॥१॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि । यशोदा गोविंदी प्रेम पान्हा ॥२॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी । तो यमुनेच्या तटी गायी चारी ॥३॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडे । ब्रह्मांडा एवढे तदाकार ॥४॥

अर्थ:
ज्याचे चिंतन सतत करणाऱ्या साधकाला तो सापडत नाही तो परमात्मा गोपिकांच्या प्रेमभक्तिमुळे सतत त्यांच्या ध्यानात असतो. ज्याला यशोदा आपला प्रेमपान्हा पाजते त्या सगुण गुणनिधीला मी पाहिला. यमुनेच्या तटावर गायी चारणारे ते परब्रह्म सृष्टीतील कोणत्याच स्वरुपात बंधिस्त होत नाही. निवृतिनाथ म्हणतात, त्याच कृष्णरुपाला माझे नामसाधन बनवल्यामुळे सर्व ब्रह्मांड मला तदाकार एकरुप दिसत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग