वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

गगन ग्रास घोटी ब्रह्

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090029 · अभंग क्र. १५७

157.
गगन ग्रास घोटी ब्रह्मांड हे पोटी । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥१॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥२॥
आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा ह्रषिकेश गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति साधन निरालंबी ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझे ॥४॥

अर्थ:
ज्याच्या एका घासात गगन हरपते ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तेच परब्रह्म ह्या जगताचे चैतन्य स्वरुप आहे. नंद यशोदेकडे त्याला खेळताना मी त्या सुंदर जगजेठीला पाहिला. जो एकत्वाने सर्व आकाश बनुन व्यापला आहे तोच हृषीकेश गोपी बरोबर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्रीकृष्ण नाम सोडुन इतर कोणतेही साधनचा उपयोग मी माझ्या ध्यानासाठी करत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग