(तुकोबांच्या अभंगाती
3485.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
विषयी अद्वये । त्यासी आम्हा सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥धृपद॥
वासनेची बुंथी । तेथे कैची ब्रम्हस्थिति ॥२॥
तुका म्हणे असता देही । हा जमे ती तेथे नाही जमेती ॥३॥
अर्थ :
जे नेहमी विषयासक्त असतात त्यांना आम्ही कधीही शिवू नये व कधी शिवणारही नाही. देव निष्काम आहे त्यामुळे तो विषयास्कत माणसापासून निराळाच राहातो म्हणजेच त्यांच्यापासून वेगळा राहातो. ज्याच्या ठिकाणी वासना नेहमी असते तेथे ब्रम्हस्थिती तरी कशी उत्पन्न होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या ठिकाणी देहभाव आहे त्याला देवाची प्राप्ती कधीही होणार नाही.
