ब्रम्हीभूत होते काया
882.
ब्रम्हीभूत होते काया ।
श्रीहरि पाया अनुसरता ॥१॥
परि हा विश्वास नुमटे मनी ।
जाती म्हणऊनि निरया गावा ॥२॥
जिही केला हा सायास ।
पावले पदास ते संत ॥३॥
निळा म्हणे अनुभवसिध्द ।
ऐसा प्रसिध्द कलियुगी ॥४॥
882.
ब्रम्हीभूत होते काया ।
श्रीहरि पाया अनुसरता ॥१॥
परि हा विश्वास नुमटे मनी ।
जाती म्हणऊनि निरया गावा ॥२॥
जिही केला हा सायास ।
पावले पदास ते संत ॥३॥
निळा म्हणे अनुभवसिध्द ।
ऐसा प्रसिध्द कलियुगी ॥४॥