हरावया कलीचे दोष ।
1403.
हरावया कलीचे दोष ।
साच हे अंश श्रीहरीचे ॥१॥
म्हणोनिया सामर्थ्य अंगी ।
वागविती जगी निभ्रांत ॥२॥
भक्तिलेणे लेऊनिया ।
विचरती मायालाघवी ॥३॥
निळा म्हणे संदेह नाही ।
यदाथी काही त्रिसत्य ॥४॥
1403.
हरावया कलीचे दोष ।
साच हे अंश श्रीहरीचे ॥१॥
म्हणोनिया सामर्थ्य अंगी ।
वागविती जगी निभ्रांत ॥२॥
भक्तिलेणे लेऊनिया ।
विचरती मायालाघवी ॥३॥
निळा म्हणे संदेह नाही ।
यदाथी काही त्रिसत्य ॥४॥