हरीचिया भजने हरिचे ज
1404.
हरीचिया भजने हरिचे जन ।
करिती पावन पतितांसी ॥१॥
ऐसा त्यांचा अगाध महिमा ।
निरुपमा तो न वर्णवे ॥२॥
देऊनिया परमार्थसिध्दी ।
पावविती पदी श्रीहरीच्या ॥३॥
निळा म्हणे सत्संगसुख ।
गणिता अधिक् परमामृता ॥४॥
1404.
हरीचिया भजने हरिचे जन ।
करिती पावन पतितांसी ॥१॥
ऐसा त्यांचा अगाध महिमा ।
निरुपमा तो न वर्णवे ॥२॥
देऊनिया परमार्थसिध्दी ।
पावविती पदी श्रीहरीच्या ॥३॥
निळा म्हणे सत्संगसुख ।
गणिता अधिक् परमामृता ॥४॥