वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

बुद्धि बोध नाही क्षम

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090094 · अभंग क्र. २०६

206.
बुद्धि बोध नाही क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥१॥
नाही काळ वेळ नाही तो नियम । सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥२॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे । ते सर्व हा गोविन्द आम्हा दिसे ॥३॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला । सर्वकाळ जाहला हरिरूप ॥४॥

अर्थ:
त्याचा अंगीकार केला की बुध्दीला त्याच्या शिवाय बोध नसतो व द्वैतभावच राहात नाही म्हणून सर्वत्र क्षमा तो देऊ लागतो म्हणजेच देहभाव त्याला अर्पण झाला असे समजते. त्याच्याशी एकरुप झाले की मग काळ वेळ यांची गणती गौण होते. सर्व यमनियम, नेम तोच होऊन जातात.गहिनीनाथांच्या कृपेने ती अवस्था लाभल्या मुळे मी हरिरुप झालो सर्वत्र गोविंदच दिसु लागला. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सफळ अनुग्रहामुळे सर्व काळ माझ्या साठी हरिरुप पावते झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग