आम्हा भाविकांची जाती
159.
आम्हा भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती ।
अळंकारयुक्ति । सरो शकेचि ना ॥१॥
जाणे माउली त्या खुणा । क्षोभ उपजो नेदी मना ।
शांतवूनि स्तना । लावी अहो कृपाळे ॥२॥
तुज अवघे होऊ येते । परि मज बाटो नये चित्ते ।
उपासने परते । नये काही आवडो ॥३॥
करू रुपाची कल्पना । मुखी नाम नारायणा ।
तुका म्हणे जना । जळस्थळ देखता ॥४॥
