लखलखिले सुतेज माझिया
520.
लखलखिले सुतेज माझिया नयनापुढे ।
चतुर्भुज रुपडे मेघश्याम ॥१॥
तेणेचि वेधिले हदईचि राहिले ।
मागे पुढे ठेले वेष्ठुनिया ॥२॥
हदयाची भीतरी पाहता बाहेरी ।
तेचि चराचरी दिसे माये ॥३॥
निळा म्हणे तेणे हरिला देहभाव ।
सांगता हा नवलाव वाटे येरा ॥४॥
