वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ६, उपासना अभंग १६१ ते १६६

देहाचेनि दीपके पाहे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074905 · अभंग क्र. १६१

161.
देहाचेनि दीपके पाहे जो सभोवते ।
तव अवचिते तेचि ध्यान केले ॥
निराकारीची वस्तु आकारा आणिली ।
कृष्णी कृष्ण केली सकळ सृष्टी ॥
लय गेले ध्यानी ध्यान गेले उन्मनी ।
नित्य हरिपर्वणी सर्वारूपे ॥
आनंद सोहळा हरिरूपी आवडी ।
कृष्ण अर्धघडी न सोडी आम्हा ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल अभये ।
भयांचे पै भय हरपे कृष्णी ॥५॥

अर्थ :
देहाला दिपक करुन सभोवताली पाहु लागला तेंव्हा त्याला अवचित ध्यान लाभले. व त्या ध्यानात त्याला निराकार ब्रह्म दिसले जे कृष्णाने कृष्ण होऊन विश्वरुपाने आकाराला आणले. ती समाधी अवस्था प्राप्त झाल्याने ते ध्यान ही गेले व तो उन्मनी अवस्थेत गेला. व नित्य त्या हरिपर्वणीला भोगु लागला. असा तो हरिरुपी आनंद सोहळा त्याला आवडला व त्या कृष्णाने अर्धघडी ही तिथे संगत सोडली नाही. असे अभय त्या रखुमाईच्या पतीने व माझ्या पित्याने दिल्याने भयाचे भयच निवृत झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग