तुमचे चरणी राहो मन ।
571.
तुमचे चरणी राहो मन ।
करा हे दान कृपेचे ॥१॥
नामी तुमचे रंगो वाचा ।
अंगी प्रेमाचा अविर्भावो ॥२॥
ह्रदयी तुमची राहो मूर्ती ।
वाचे कीर्ति पवाडे ॥३॥
निळा म्हणे ठेवा ठायी ।
जीवभाव पायी आपुलीये ॥४॥
571.
तुमचे चरणी राहो मन ।
करा हे दान कृपेचे ॥१॥
नामी तुमचे रंगो वाचा ।
अंगी प्रेमाचा अविर्भावो ॥२॥
ह्रदयी तुमची राहो मूर्ती ।
वाचे कीर्ति पवाडे ॥३॥
निळा म्हणे ठेवा ठायी ।
जीवभाव पायी आपुलीये ॥४॥