अविनाश नाम स्वयंभ सं
668.
अविनाश नाम स्वयंभ संचले । ते उभे चांगले विटेवर ॥१॥
वर्णिता वेदांसी न कळेचि पार । ते उभे साचार विटेवरी ॥२॥
मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी नाम अविनाश । गाता जाती दोष जन्मांतरींचे ॥४॥
