जयालागीं करिती योगी
669.
जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥
न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गाता सोपा सर्वा ॥२॥
नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शने उद्धरे जडजीवां ॥३॥
पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापिवरी ॥४॥
एका जनार्दनी चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तासाठीं ॥५॥
