ऐशा परि नमन माझे पंढ
651.
ऐशा परि नमन माझे पंढरीनाथा ।
तूचि होऊनि तुजमाजि झालो मी सरता ॥१॥
नये कळो काही आता एकानेक भाव ।
तुज माजी मीही मजमाजि तू सर्व ॥२॥
नाम रुप तूचि माझे क्रिया कर्तव्य ।
कायिक वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥३॥
निळा म्हणे मी तू उपाधी सारुनिया परती ।
राहो जैसे होतो तैसे निजरुप एकांती ॥४॥
