ऐसा निळा नित्यानंदी
652.
ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला ।
देऊनिया नामस्मरण चरणी स्थापिला ॥१॥
तेणे ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी ।
आठवूनि रुप तुमचे हदयमंदिरी ॥२॥
नेणे आपपर नेणे जन विजन ।
नेणोनिया काहीचि नुरवी देहाचे भान ॥३॥
निळा म्हणे हाचि माझा ऐश्वर्य भोग ।
काया वाचा मानस अवघा पांडुरंग ॥४॥
