वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

एवढासा माझा भाव तो क

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089283 · अभंग क्र. ६५०

650.
एवढासा माझा भाव तो कायी ।
तेवढाचि तुमचिये ठेविला पायी ॥१॥
परी तुमचे अगाध देणे ।
जाणवले यावरी उदारपणे ॥२॥
एवढिसी माझी मति ते किती ।
तेवढीचि वाढवुनि केली सरती ॥३॥
एवढेसे तुम्हा गाइंले जी देवा ।
तेवढेंचि स्वीकारुनी तोषलेति भावा ॥४॥
एवढीशी माझी वाचा ते किती ।
तेवढीचि आपुलिये लाविली स्तुति ॥५॥
एवढासा निळा एवढीसी भक्ती ।
अपारचि तुम्ही मानिली प्रीती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग