उदर भरावया केले असे
530.
उदर भरावया केले असे ढोंग ।
घरोघरी बोंब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना लोका सांगे ज्ञान ।
धरोनिया ध्यान बक जैसा ॥२॥
आपण बुडती लोका बुडविती ।
हात धरूनी जाती यमलोका ॥३॥
विठा म्हणे काय करू त्यांच्या कपाळा ।
पापाचा कंटाळा न करिती ॥४॥
