वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पंढरी हे क्षेत्र पाव

🙏 4. संत नामदेव · ABH-082968 · अभंग क्र. ३९५

395.
पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र|महिमा विचित्र त्रिभुवनीं॥१॥
पाहिलिया क्षणी नासती पातकें|ऐसियासी तुके दुजे कोण॥२॥
तृण पक्षी सर्व जाले ऋषिदेव|पहाती वैभव पंढरीचें॥३॥
भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी|वैकुंठीची परी सर्व येथे॥४॥
टाळ नृत्य घोष पताकांचे भार|गर्जे भीमातीर सर्वकाळ॥५॥
पुंडलिकासाठी ठाके केशीराज|भेटीने सायुज्य त्यास देती॥६॥
स्नाने उद्धरती दर्शने प्रशस्ती|वाचे नाम कीर्ती विठोबाची॥७॥
नामा म्हणे लाभ थोर हा जोडतो|पंढरिसी येतो प्राणी त्यासी॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग