वैकुंठासी आम्हा नको
440.
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी | वास दे पंढरी सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी |नको अडाअडी घालू आम्हा ॥२॥
वैकुठी जाऊनि काय बा करावे |उगेंचि बैसावे मौनरूप ॥३॥
नामा म्हणे मज येथेंच हो ठेवी |सदा वास देई चरणांजवळी ॥४॥