वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080528 · अभंग क्र. ३४५८

3458.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
गुरुमार्गामुळे भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाही ब्रह्मी ॥१॥
पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥धृपद॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥
काही टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥
नसता करुनी होम खाती एके ठायी । म्हणती पाप नाही मोक्ष येणे ॥४॥
इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥
नाही शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणे द्रव्य काही ॥६॥
तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥

अर्थ :
अशा या ढोंगी शाक्तगुरुमार्गामुळे सर्व लोक भ्रष्ट होतात आणि ते लोकांना म्हणतात की ब्रम्हाला कोणतीही जात कुळ नाही. असे हे लोक पवित्र माणसांना कंटक म्हणून संबोधतात आणि याची संगती नको असे म्हणून त्याचा त्याग करतात अनामिक म्हणजे अत्यांजादिकांना हे आपले मानतात. हे शाक्तउपासक गुरु काय करतात तर ढोर, लोहार, चांभार, न्हावी, वेसकर, कुंभार, रस्ते झाडणारे इत्यादी बारा बलुतेदारांना व त्यांच्या घरातील स्त्रीया पोरांना उपदेश करत असतात. असे हे शाक्तउपासक असलेले लोक जारणमारण मंत्रतंत्र जादूटोणा इत्यादी चमत्काराचा उपयोग करतात व त्याच चमत्काराला बळी पडून ब्राम्हण वर्ग देखील त्यांचे शिष्य होतात व त्यांच्या स्वधर्माची फजिती करुन घेतात. शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वर्णन नसलेला खोटा होम हे लोक करतात आणि सर्व जातीतील लोक एकत्र येऊन हे लोक जेवण करतात व हे म्हणतात यामधे कोणतेही पाप नाही याने मोक्षच मिळणार आहे.

3459
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
शाक्त गधडा जये देशी । तेथे राशी पापाच्या । । १। ।
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रिये । । २। ।
क्रोधरूपे वसे काम । तीचे नाम जपतसे । । ३। ।
मद्यभक्षण मांगिणजाती । विटाळ चित्ती साठविला । । ४। ।
स्तवूनिया पुजी रांड । न लगे भांड दाढीसी । । ५। ।
तुका म्हणे भगवती । नेईल अंती आपणापे । । ६। ।

अर्थ :
ज्या देशात शाक्तपंथाचे अनुसरण करणारा गाढव राहतो त्या देशात पापाचा ढीग साचलेला असतो. । । १। । असे लोक आपल्या पुर्ण पुण्याईचा नाश करून इंद्रियांचे लाड पुरवण्यात वेळ घालवतात. । । २। । तेथे क्रोधरुपाने कामवासना रहात असते. कामवासनेलाच देवी समजून ते तिची पुजा करत राहतात. । । ३। । शाक्त लोक हीन स्त्रीला मद्यभक्षण करवतात व स्वतःही करतात. अशा रितीने ते स्वतःच्या चित्तात विटाळ साठवत असतात. । । ४। । त्या मद्य प्राशन केलेल्या स्त्रीची स्तुती करतात आणि नंतर एकमेकांत तिच्यावरून भांडत बसतात. । । ५। । तुकोबा म्हणतात, एवढे सगळे करून शाक्त लोक विचार करतात की अंतकाळी भगवती आम्हाला मुक्ती देईल. । । ६। ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग