एक भानू अवघा सृष्टीच
867.
एक भानू अवघा सृष्टीचा सोहळा | व्यापूनि सकळा आकाशासी ॥१॥
पवनसिंधुवरी मन वेगे पाखरी | मार्गु षटचक्री वैकुंठासी ॥२॥
तोचि भोगी सुख चिदानंदी वासू | संतसंगे प्रकाशु सफळ मग ॥३॥
नामा म्हणे यासी गुरुकृपा पाहिजे | संतसंगे पाविजे केशवचरण ॥४॥
