चालता मारगी फुटतसे व
1745.
चालता मारगी फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥
तैसे नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥
नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाट । मार्ग आहे नीट संतसंग ॥३॥
एका जनार्दनी सांपडलें सहज । तेणे जाहलें काज सरते माझे ॥४॥
