वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

चोखियाचे घरी चोखियाच

🙏 24. संत बंका · ABH-075628 · अभंग क्र. २४

24.
चोखियाचे घरी चोखियाची कांता । सोयरा तत्वता नाम जीचे ॥१॥
बहु दिवस करी प्रपंच कारण । परि नव्हे संतान तिजलागी ॥२॥
बैसोनिया एकांती आठवी पंढरीराणा । म्हणे का वो नारायणा विसरलासी ॥३॥
आमुचीया कुळी नाही वो संतान । तेणे वाट शीण मना माझ्या ॥४॥
ऐकोनी पंढरीराव हांसलासे मनी । म्हणे ऐके रूक्मणी गोष्ट एक ॥५॥
चोखियाचे कांता चिंताक्रांत मनी । संसारी असोनी उदास वृत्ती ॥६॥
पोटी नाही मूल करी तळमळ । बंका म्हणे विठ्ठल काय करी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग