वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

चोखियाचे घरी नवल वतर

🙏 24. संत बंका · ABH-075657 · अभंग क्र. २३

23.
चोखियाचे घरी नवल वतर्ले । पाहुणे ते आले देवराव ॥१॥
सोयरा निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरि आला तेव्हा ॥२॥
खोपट मोडके द्वारी वृंदावन । बैसे नारायण तया ठायी ॥३॥
दोघी प्रेम भरित धरिती चरण । घालिती लोटांगण जीवे भावे ॥४॥
कोठोनिया स्वामी आलेती ते सांगा । येरू म्हणे पै गा दूर देशी ॥५॥
झाले दोन प्रहर क्षुधेने पीडिलो । म्हणोनिया आलो तुमचे सदनी ॥६॥
कोणाचे हे घर सांगा हा निधार्र । ते म्हणती महार आम्ही असो ॥७॥
येरू म्हणे घरी कोण अधिकारी । कैसी चाले परी संसाराची ॥८॥
मग त्या ऐकोनी तयाचे बोलणे । म्हणती देवाजीने निके केले ॥९॥
बंका म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरि । चोखियाचे घरी राहे सुखें।
॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग