वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

भजन करा रे हरिहरा |

🙏 4. संत नामदेव · ABH-083282 · अभंग क्र. ७०३

703.
भजन करा रे हरिहरा | नारायण शिवशंकरा |माझे बोलणे हे अवधारा | भेद न करा दोघांचा ॥१॥
तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत | पाहे पा तेथीचा दृष्टांत |नारायणे सेविले अमृत | जाला श्वेत महादेव ॥२॥
शंभूने गिळिले हलाहला | म्हणोनि विष्णू जाला निळा |देखत देख आंधळा | झणी होसी गव्हरा ॥३॥
लक्ष्मीरूपे आपण हरू | देवे वरिला शारंगधरू |गरुडरूपे महेश्वरू | वहन जाला विष्णूचे ॥४॥
शक्तिरूपे शारंगपाणि | नारायण जाला भवानी |शारंगधर नंदी होऊनि | सन्मुखासनी बैसला ॥५॥
एक तो एक वेगळा नाही | दृष्टांत तू आगमी पाही |नामा म्हणे एक केशव ध्यायी | हरिहर पाही ज्याचे अवतार ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग