वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

जीवे जीव नेणे पापी स

🙏 3. संत तुकाराम · ABH-080440 · अभंग क्र. ३२१६

3216.
जीवे जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापू बैसे ॥१॥
आत्मा नारायण सर्वा घटी आहे । पशुमध्ये काय कळो नये ॥धृपद॥
देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥२॥
तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखे ॥३॥

अर्थ :
पशू हत्या करणारे जीवाला जीव जाणत नाहीत ते पापी दैत्यासारखेच कृती करतात पशूची हत्या करण्यासाठीच बसलेले असतात. नारायण हा आत्मरुपाने सर्व घटी व्यापलेला आहे मग तो जसा मनुष्यामध्ये आहे तसाच पशूमध्येही आहे हे त्या पशू हत्या करणाऱ्या पापी मनुष्याला समजू नये काय ? पशूची हत्या करताना तो पशू कसा हुंबरतो कसा ओरडतो हा तो पापी पाहात नाही काय मग तरी देखील पशूची हत्या करताना त्याचे हात तरी कसे चालतात ? तुकाराम महाराज म्हणतात. तो चांडाळ नरकामध्ये जाणार नक्कीच परंतू नरकामध्ये जाऊन अनेक महादु:खे भोगीन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग