वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

हरिदास संगे हरिदास ख

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089974 · अभंग क्र. १६३

163.
हरिदास संगे हरिदास खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥१॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व । तिही मनोभाव अर्पियेला ॥२॥
पुंडलिकफळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमे डुले ॥३॥
निवृत्ति लोळत चरणरजी लाटा । माजि त्या वैकुंठा आत्मलिंगी ॥४॥

अर्थ:
हरिच्या दासा सोबत घालवलले वेळ हरिदासासाठी जे ब्रह्मादिक सोहळे भोगतात तसाच असतो. हरिदास म्हणजे त्याचे नाम घेणारे संत मुनी देव सनकादिक ज्यांनी आपल्या सर्व इच्छा त्याच्या पायाशी अर्पित केल्या आहेत.त्याच मुळे संत पुंडलिकाच्या कृपेमुळे ते सगुण परब्रह्मचे प्रेम आपल्याला प्राप्त झाले आहे. तेच प्रेम मिळाल्यामुळे महादेव शंकर ही डोलत असतात.निवृतिनाथ म्हणतात, त्या आत्मलिंग असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चरणरजांच्या लाटात मी लोळत पडलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग