वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सोपान संवगडा स्वानंद

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090109 · अभंग क्र. १६४

164.
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥१॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचे ॥२॥
नरहरि विठा नारा ते गोणाई । प्रेम भरित डोही वोसंडती ॥३॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलिकसंगे हरि खेळे ॥४॥

अर्थ:
सोपे नाम जपणारा सोपान, नित्य स्वानंद स्वरुप प्राप्त करणारे ज्ञानदेव व श्री विठ्ठलावर प्रचंड भाव असणारी मुक्ताई सोबत आहे. विसोबा खेचरासही त्या विठ्ठलाचे प्रेम लाभल्यामुळे हे सर्व टाळ दिंडी घेऊन त्या विठ्ठलाचे नाम घोळवत आहेत. नरहरी सोनार, विठा, नारा ही नामदेवांची मुले व गोणाई हे सुध्दा त्या विठ्ठला नाम डोहात प्रेमभरित झाले आहेत. निवृतिनाथ ज्ञानदेवाला स्पष्ट सांगतात हे ज्ञानराजा तो पुंडलिक श्री विठ्ठलाबरोबर खेळत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग