अलक्ष्या अच्युता सख्
525.
अलक्ष्या अच्युता सख्या भक्त राया| तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥
परात्परतरा पार नेणे ब्रह्मा | तूंचि निजधामा स्वये देसी ॥२॥
विश्वामित्रासाठी विलंब न करी | बळिचिया द्वारी भृत्य होसी ॥३॥
नामा म्हणे तुझी माव नेणे कोणी | धांवे चक्रपाणि त्वरे नेटे ॥४॥
