वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

भगवंता तुजकारणे मेलो

🙏 3. संत तुकाराम · ABH-079553 · अभंग क्र. ३९२३

3923.
भगवंता तुजकारणे मेलो जीताचि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तयेसी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥धृपद॥
भुक्तिमुक्ति तूचि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वे त्याग केला धाव घातली आता । कृपादान देई देवा येउनि सामोरा आता ॥२॥
संसारसागरू गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ ॥३॥
तिही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलो वरी खोडा भाव धरूनि टेंका ।
जाणवी नरनारी जागो धर्म लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥
नाठवे आपपर आता काय बा करू । सारिख दोहीसवा हारपला विचारू ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

अर्थ :
हे भगवंता तुझ्यावाचून आम्ही जीवंत असून मेल्यासारखे झालो आहोत, हे देवा आमची बुध्दी निष्काम झाली असून तिला कोणतेही चलनच राहिले नाही. देवा आमचे हातपायही आता चालत नाही आमची दृष्टी कशी फिरली आहे ते पहा आम्ही तुझे क्षर आणि अक्षर म्हणजे व्यापक आणि अलिप्त रुप जाणत आहोत तरी न जाणल्यासारखेच करतो तुझे ते रुप आम्ही माहित असून देखील पहात नाही. हे विठोबा तुझ्या नामासारखेच दान मला दे म्हणजे तुझ्या नामाची किर्ती जशी थोर वर्णन केलेली आहे तशाच प्रकारचे थोर दान तू मला दयावेस. देवा भुक्ति, मुक्ति, सिध्दीचा दाता तूच एक आहेस त्यामुळे तर आम्ही शोक, भय, लाज, चिंता टाकून दिली आहे. देवा मी स

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग