मेळवुनि सगळे गोपाळ ।
216.
मेळवुनि सगळे गोपाळ । काही करिती विचार ॥१॥
चला जाऊ चोरु लोणी । आजि घेऊ चंद्रधणी ॥२॥
वेळ लावियेला अझुनी । काय करिता गडे हो ॥३॥
वाट काढिली गोविंदी । मागे गोपाळांची मांदी ॥४॥
अवघाचि वावरे । कळो नेदी कोणा खरे ॥५॥
घर पाहोनी एकांताचे । नवविधा नवनीताचे ॥६॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥७॥
बोलो नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥८॥
जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥९॥
