वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 123. हनुमानजन्म - अभंग ३४११ ते ३४१३

घारीमुखींचा पिंड अंज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085476 · अभंग क्र. ३४१३

3413.
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करी । पडता निर्धारी भक्षियला ॥१॥
नवमास होता जाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडले ती ॥३॥
जन्मतांची जेणे सूर्यातें धरियले । इंद्रादिका दिले थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथे ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पै होती । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशी बाळ । देता प्रात:काळ होता तेव्हा ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग