वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

खंडेराया तुज करिते न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073676 · अभंग क्र. ११

11.
खंडेराया तुज करिते नवसू । मरू देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरु दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद । मरू दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद मरता होईन मोकळी । गळा घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडे अवघे मरु दे । एकटी राहू दे पायापशी ॥५॥

रविवार चे अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग