अरूप रूपासी आलें|परब
426.
अरूप रूपासी आलें|परब्रह्म ठसावले |भक्ता पुंडलिका फावले |गौप्य जाले प्रगट ॥१॥
धन्य धन्य भिंवरातट | चंद्रभागा वाहे निकट |धन्य धन्य वाळुवंट | मुक्तिपेठ पंढरी ॥२॥
धन्य धन्य पद्माळें| सबराभरित स्वानंदजळे |स्नान केलिया निर्मळे | कोटिकुळे उद्धरती ॥३॥
धन्य धन्य गा मानदेशु| जेथे विठ्ठले केला रहिवासु |नामा विनवी विष्णुदासु | देई सौरसु भक्तीचा ॥४॥
