काला - अभंग २३२ ते २
232.
काला - अभंग २३२ ते २६३
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥
यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥
आणिती शिदोर्या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥
शिळ्या विटक्या भाकरी दही भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥
एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ । ठकविलें तेणे ब्रह्मादिक सकळ ॥५॥
