(व्यभिचारिणी स्त्रीच
3425.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
नाही काम माझे काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी झाले ॥२॥
न धरावा लोभ काही मजविशी । झाले देवपिशी तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)हे लोकहो माझे तुमच्याजवळ आता कोणत्याही प्रकारचे काही कामही नाही आणि जे गुप्त माहिती होती ती तुम्हाला माहितही करुन दिली आहे. आणि चित्तरुपी स्त्री पुढे म्हणते माझा व्याभिचार तुम्हाला आता ठाऊक झाला आहे त्यामुळे लोकांमध्ये मी मान्य होण्यासारखी राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्याविषयी कोणीही लोभ धरु नये कारण मी आता देववेडी झालेली आहे.
