वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

नमुं जाय तंव गुरुत्व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084610 · अभंग क्र. १८३२

1832.
नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आले गुरुत्वा ॥१॥
ते आता नमना नुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसारु ॥२॥
वंद्यत्वें नमुं गुरुभेदे । तंव त्रैलोक्य गुरुत्वे नांदें ॥३॥
गुरुवांचुनीं न दिसे कांही । तंव सानथोर अवयवें गुरु पाही ॥४॥
थोर गुरुत्वा आले गौरव । तरी गुरुनामें नेघे अहंभाव ॥५॥
एका जनार्दनाच्या पायी । नमुं गेलों तो गुरुशिष्य नाही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग