संतसंगे हरे पाप ।
1416.
संतसंगे हरे पाप ।
संतसंगे निरसे ताप ।
संतसंगे निर्विकल्प ।
होय मानस निश्चळ ॥१॥
संतसंगे वैराग्य घडे ।
संतंसगे विरक्ती जोडे ।
संतसंगे निजशांति वाढे ।
साधन ह्रदयी अखंडित ॥२॥
संतसंगे हरिची भक्ति ।
संतसंगे ज्ञानविरक्ति ।
संतसंगे भुक्तिमुक्ती ।
साधका वरिती अनायासे ॥३॥
निळा म्हणे साधुसंगे ।
महाभाग्याचे हे भाग्य ।
सेविती ते स्वरुप चांग ।
पावती आत्मया श्रीहरीचे ॥४॥
