वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

उपाधीजे बीज । जळोनि

🙏 3. संत तुकाराम · ABH-077845 · अभंग क्र. २१४१

2141.
उपाधीजे बीज । जळोनि राहिले सहज ॥१॥
आम्हा राहिली ते आता । चाली देवाचिया सत्ता ॥धृपद॥
पराधीन ते जिणे । केले सत्ता नारायणे ॥२॥
तुका म्हणे जाणे पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥

अर्थ :
सर्व उपाधीचे बीज म्हणजे अज्ञान आहे आणि ते नारायणाच्या ज्ञानाने जळून गेले आहे. आम्ही जे काही करणार आहोत ते केवळ देवाच्या सत्तेनेच. आम्ही नारायणाच्या आधीन जिणे जगत आहोत. त्याच्या सत्तेनेच जे होईल ते आम्ही करत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे सर्व उपाय खुंटले आहेत मी केवळ नारायणाचे चरणच जाणतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग