वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

गोविंदा वांचोनि वदे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077995 · अभंग क्र. २१४२

2142.
गोविंदा वांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनि सिसफूल गुडघा । चार तो अवघा बावळ्याचा ॥धृपद॥
अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । म्हणता शाहाणा येईल कैसा ॥२॥
तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनी भाव तैसा ॥३॥

अर्थ :
जो आपल्या वाणीने गोविंदावाचून व्यर्थ बडबड करतो त्याची बडबड म्हणजे हगवणीतल्या पीटपीटीप्रमाणे आहे. स्त्रीने जर डोक्याला लावायचे फूल गुडघ्याला लावले तर तीचे ते वागणे चारचौघामधे मुर्खपणाचे ठरते. कोणाच्याही पायातला जोडा म्हणजे वहाणे हे शरीराप्रमाणेच पुज्य आहे असे समजून त्याची पूजा करतो त्याला शहाणा कसे म्हणता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदावाचून इतर कोणाही विषयी बडबड करणे किंवा बोलणे म्हणजे वेश्येला सुवासीण म्हणून बोलावण्यासारखेच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग