पंढरपुरी ज्ञानेश्वरी
469.
पंढरपुरी ज्ञानेश्वरी ।
मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥
तेथे देव येथे भक्त ।
महिमा अदभुत दोहीचा ॥२॥
तेथे ध्यान येथे ज्ञान ।
परलोक साधन दो ठायी ॥३॥
निळा म्हणे तेथे गुरुड ।
येथे झाड अजानतरु ॥४॥
469.
पंढरपुरी ज्ञानेश्वरी ।
मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥
तेथे देव येथे भक्त ।
महिमा अदभुत दोहीचा ॥२॥
तेथे ध्यान येथे ज्ञान ।
परलोक साधन दो ठायी ॥३॥
निळा म्हणे तेथे गुरुड ।
येथे झाड अजानतरु ॥४॥