तुळशी पाहता आपोआप ।
3407.
तुळशी पाहता आपोआप । सहज जाय पापताप ॥१॥
तुळशी सेवा रे जननी । जे पढिये जनार्दनी ॥२॥
करिता प्रदक्षणा मने । भवरोगा उपशमन ॥३॥
मुळी निक्षेपितां जळ । कळिकाळा सुटे पळ ॥४॥
जिचे लागता सिंतोडे । कर्माकर्म समूळ उडे ॥५॥
भावे करिता पूजन । भगवंती होय समाधान ॥६॥
मुळी मृत्तिका कपाळीं । जन्ममरणा होय होळी ॥७॥
सेवी एका जनार्दन । तुळशी सबाह्य हरी पूर्ण ॥८॥
