रात्रंदिवस घोकीतों त
3912.
रात्रंदिवस घोकीतों तुम्ही सावध असा । तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा । उजेडपडतांना गळा पडेल फासा ॥१॥ उठा की जीमायबाप । कशी लागली झोंप । हुजुर जाऊनियाएवढी चुकवा खेप ॥धृ.॥ २२॥ तुमच्या नगरीचीनाही नांदणुक बरी । तुमच्या सेजेला दोन लोभीष्ट । नारी । त्यांच्या योगें दु:खें तुमच्या नगरांत भारी ॥३॥ हिंडतां देशांतरीं चौऱ्याऐंशी जग । अजुनीसांपडला नाही नीट सुमार्ग । कोणते हित केलेंबापा सांग ॥४॥ जुन्या ठेवण्याचा तुम्ही पुर्जा काढात्यांच्या आधारें बोलत घडघडा । एका जनार्दनींधरा बळकट मेढा । चाकर हुजूरचा घेईन अवघाझाडा॥५॥
