उठा उठा मायबाप । नका
3913.
उठा उठा मायबाप । नका येऊ देऊझोंप । आली वो आली यमाजीची तलब ॥१॥ तुमचेंगांवांत नाही पाटीलबावा । पाटलीण आवाचा मोठादावा । घरचे घरकुल झांकुन ठेवा॥२॥तुमच्यासुनेची नाही वागणूक बरी । तिचे घरधनी मनाजीपाटील थोरी । त्यांच्यातील वाद साऱ्या गावांतभारी ॥३॥ पाटील बावाची ऐकावी थोरी । सहाकारभार करती घरी । पांच ती पारे रडतीदारोदारी ॥४॥आता पाटीलबावा तुम्ही हुषारी धरा । यमाजीबाजी वो येतील घरां । इकडुन तिकडे वोंनाहीं पळाया थारा॥५॥एका जनार्दनी कांही हितकरा । आपला आपण चुकवा फेर । जन्ममरणाचातोडा येरझारा ॥६॥
