वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

एक भानु गिळू दुजे द्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074388 · अभंग क्र. ६५९

659.
एक भानु गिळू दुजे द्वैत उगळू ।
कासेवीचा मेळू गिळू सगळा ॥१॥
पोटभरू येणे वैकुंठीचे पेणे ।
सेवासुख जाणे कृष्णसुखी ॥२॥
डोंगर सगळे मायेचे मोकळे ।
प्रपंचा नाकळे या हेतु ॥३॥
ज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाध्य ।
येर तत्त्व बोध्य मुक्त कैचे ॥४॥

अर्थ :
एक भानू म्हणजे परमात्मवस्तु तिचे ज्ञान गिळू म्हणजे अंतःकरणांत साठवू आणि प्रपंचाचे द्वैत उघड़ म्हणजे टाकून देऊ. प्रपंचातील विषयसुख हे कासवीचे दूध गिळण्यासारखे मिथ्या आहेत म्हणून त्याचा त्याग करू. ज्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने श्रीकृष्णाचे सेवासुख जाणले आहे तोच खरा सुखी असून त्यास वैकुंठ प्राप्ती आहे. कारण प्रपंचाचे वैषयीक सुख कितीही मोठे असले तरी मिथ्या आहे. असे जीवब्रह्मैक्य अंतःकरणाच्या उपाधिने मला साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे. परमात्म्याची प्राप्ती मला ज्ञानाने साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे. संसाराच्या ज्ञानाने कोण व कसा मुक्त होणार मुळीच होणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग