वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(भुपाळ्यांवरील अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-080426 · अभंग क्र. ३४७२

3472.
(भुपाळ्यांवरील अभंग)
ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ । का हो कळवळ तुम्हा उमटेचिना ॥१॥
आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनिया आसे चाळवूनी ठेविले ॥धृपद॥
काय जन्मा येवूनिया केली म्या जोडी । ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू ॥२॥
तुका म्हणे खरा न पवेचि विभाग । धिक्कारिते जग हेचि लाहे हिशोबे ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही मला बोलावण्यासाठी निरोप पाठवाल अशी मी वाट पाहातो आहे पण तुमचा निरोप काही येत नाही तुम्हाला माझ्याविषयी कळवळा का येत नाही ? अहो पंढरीनिवासी पाडूरंगे तुमची आवड मला लावून तुम्ही मला असे का फसविले आहे ? जन्माला येऊन मी काय प्राप्त करु घेतले काय लाभ मला झाला याच विषयी घडोघडीला विचार माझ्या मनात येतोय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला माझ्या वाट्याचा खरा हिस्सा तर मिळालाच नाही परंतू जगाने माझा धिक्कार करावा हाच हिशोब माझ्या पदरात पडला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग