७३१, अभंग :- पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ७३१
पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावे ते नाभी करवी दंड ॥धृपद॥
नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥
तुका म्हणे हात झाडिले परत्री । श्रम तोचि श्रोत्री ठेवी केली ॥३॥

अर्थ
हरी ची कथा गायत्री मंत्र इत्यादी पुण्यकर्म ची विक्री करणे म्हणजे प्रत्यक्ष मातेशी गमन केल्यासारखेच आहे आणि हे पुण्यकर्म करून मिळालेले धन म्हणजे भाड्याचे धन घेणे म्हणजे मातेचा विटाळच हातात घेण्यासारखे कर्म आहे. विषयांचा लोभ असणारा मनुष्य हा आत्महत्यारा आहे अशा मनुष्यास दंड करण्यास भिऊ नये त्याला निसंकोचपणे दंड करावा, त्याला(विषय लोभी) दंड करणाऱ्या व्यक्तीस तू “घेऊ नकोस खुशाल दंड कर” असे म्हणावे. विषय लोभी मनुष्य हरी कथेची विक्री करतात पुण्यकर्म ची विक्री करून ते परीस देऊन काचेचा तुकडा घेतल्यासारखे करतात आणि परमार्थातील मोठा लक्ष्मी द्रव्यरूप ठेवा घेण्यास ते मुकतात. तुकाराम महाराज म्हणतात या लोभीवेद संपन्न मनुष्यांनी यज्ञयाग इत्यादी कर्म करून पुण्याचा साठा केलेला असतो त्यानिमित्ताने त्यांना स्वर्गप्राप्ती तर होते परंतु त्यांच्या पुण्याचा साठा संपला की ते पुन्हा आपले हात झाडून नागवे होतात म्हणजे शेवटी त्यांच्या हातात केवळ करत श्रमच उरतो.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading