पराविया नारी माऊली स
196.
पराविया नारी माऊली समान । मानिलिया धन काय वेंचे ॥१॥
न करिता परनिंदा एरद्रव्य अभिलाप । काय तुमचे यास वेचे सांगा ॥२॥
बैसलिया ठायी म्हणता राम राम । काय होय श्रम ऐसे सांगा ॥३॥
संतांचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥४॥
खरे बोलता कोण लागती सायास । काय वेंचे यास ऐसे सांगा ॥५॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणिक ते आटी न लगे काही ॥६॥
